May 17, 2020 | 12:13

मराठी लेखक आणि ब्लॉगिंग

आईने आज मला असाच मराठीतला एक व्हाट्सअँप फॉरवर्ड दाखविला. त्या व्यक्तीने साध्या टिकली वर २००-२५० शब्द लिहिले होते. तो अशे किती तरी छान व्हाट्सअँप संदेश बनवत असणार पण त्या व्यक्तीची पोच फक्त १००-१५० लोकांपर्यंत. त्यात अर्ध्या लोकांनी त्याचे लेख वाचले पण नसणार. मी अशे किती तरी साहित्य इंग्लिश मध्ये इंटरनेटवर वाचतो पण मराठीत नेमकेच लोकं वेबवर लिहितात.

त्या मागे मोठे कारण आहे, भारतात घरा घरात मोबाइल पहिले गेला आणि कदाचित कॉम्पुटर कधी गेलेच नाही. मोबाइल वर तुम्ही लिहू शकता आणि लोकांपर्यंत पोचू शकता पण तुमचे स्वतःचेच लिखाण काही वर्षांनी दुसऱ्यांना काय तुम्हाला स्वतःला पण शोधल्यास सापडणार नाही. आपले मराठी साहित्य आणि साहित्यिक कुणापेक्षा कमी नाही पण ते कमी पडतात ते इथे. ब्लॉगिंग बद्दल आपल्याला माहितीच नाही, असली तरी ती सुरु करण्याची तडफड आपण कधी केली नाही.

ब्लॉगिंग तुम्हाला तुमचे लिखाण सुधारण्याची संधी देते कारण तुम्ही लोकांकडून अभिप्राय मागू शकता. लोकांनी लिहून नाही दिला तरी आपल्या ब्लॉगला किती लोक व कुठून वाचतआहेत त्या वरून पण आपल्याला स्वतःचा लिखाणाबद्दल एक कल्पना मिळते. तुम्हाला लोकांच्या प्रतिसादाची गरज वाटत नसेल आणि फक्त लिहायचे असेल तरी कृपा करून व्हाट्सअँप वर न लिहिता, वेबवर लिहा. स्वतःचा ब्लॉग बनवा कारण मग तुमचे साहित्य वर्षानु वर्षे इंटरनेट वर जिवंत राहील.

© Ankshilp 2020

Powered by Hugo & Kiss'Em.